जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत सूचनांची दखल : जिल्हाधिकारी   

पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत करण्यात येणार्‍या सूचनांची प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून सर्व संबंधित विभागाने याबाबत वेळेत कार्यवाही करून त्या निकाली काढाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेशन दुर्वास, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
 
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत विविध विषयांबाबत सूचना केल्या, त्यावर संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आगामी बैठकीत घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डुडी म्हणाले. बैठकीत अशासकीय सदस्य यांनी प्रामुख्याने महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महावितरण या विभागातील ग्राहकांच्या व नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना केल्या.

Related Articles