अभय प्रभावना पुण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आयामांमध्ये महत्त्वपूर्ण भर घालेल : फिरोदिया   

पुणे : अभय प्रभावना पुण्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक आयामांमध्ये महत्त्वपूर्ण भर घालेल, अशी माहिती अभय फिरोदिया यांनी दिली.फिरोदिया म्हणाले, पुण्यातील इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले, अभय प्रभावना संग्रहालय हे फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या नेतृत्वाखालील अमर प्रेरणा ट्रस्टचा एक दूरदर्शी प्रकल्प आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये उघडलेले, ३.५ लाख चौरस फूट क्युरेटेड आणि वातानुकूलित संग्रहालय शहरातील अभ्यागतांना आधुनिक आणि सोप्या पद्धतीने भारतीय तात्विक आणि आध्यात्मिक संकल्पनांमध्ये बुडण्यासाठी आणखी एक आयाम देते.
 
फिरोदिया इन्स्टिटयूट ऑफ फिलॉसॉफी कल्चर अ‍ॅड हिस्ट्री या संस्थेच्या माध्यामातून १९९१ मध्ये नवलमल कुंदनमत फिरोदिया यांनी अभय प्रभावना संग्रहालय आणि नॉलेज सेंटरची स्थापना केली. अमर प्रेरणा ट्रस्टचा भाग असलेले हे केंद्र भारतीय मूल्य, संस्कृती धर्म, परंपरेचा संगम असलेले एक अनोखे ठिकाण आहे. विशेष असे की, व्यवसायात यशस्वी वाटचाल करणार्‍या फिरोदिया कुटुंबाने फोर्स मोटर्स व्यवसायात मोठी उंची गाठत सामाजिक, शैक्षणिक आणि आरोेग्य सेवेत महत्त्वाचे योगदान दिले. आजच्या घडीला अभय प्रभावना संग्रहालय आणि नॉलेज सेंटर ही विचारांचे संग्रहालय बनले आहे. हे जैन धर्माच्या प्राचीन मूल्यांना तार्किक ज्ञानवर्धक आणि आधुनिक दृष्टीकोनातून सादर करते. शिवाय जैन धर्माची व्याप्ती, विविधता आणि योगदानावर प्रकाश टाकते. हजारो वर्षांचा इतिहास एकाच ठिकाणी शिल्प आणि स्मारकातून अनुभवता येतो. ध्वानाच्या मुद्रीत रुषभदेवांची ४३ फुटांची मूर्ती उध्दत आहे. रुषभदेव यांनी सामाजिक आणि वैयक्तित असा दोन्ही मूल्याचा पायारचला आहे. यांचा उपयोग नंतरच्या पिढांनी जैन समाजाच्या उभारणीसाठी केला.

Related Articles