दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज   

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला समक्ष भेटण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्याचे वकील वाजीद खान -बिडकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर येत्या सोमवारी (ता. २४) सुनावणी होणार आहे. 
   
स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर आरोपी गाडे याने धमकावून अत्याचार केला. या प्रकरणात त्याला अटक झाली असून सध्या तो येरवडा कारागृहात आहे. या ठिकाणी वकिलाला देखील इतर आरोपींप्रमाणे त्याच्याशी फोनवरूनच बोलावे लागते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. या घटनेमुळे गाडे हा मानसिक विवेचनातून जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून त्याच्यासोबत चर्चा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वकिल वाजीद खान बिडकर यांनी दाखल अर्जातून केली आहे. यापूर्वी पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाकडून ही मागणी पूर्ण करण्यात आली असून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Related Articles