बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण   

चंडीगढ : हिंदी बोलल्यामुळे पंजाबमधील गुरु काशी विद्यापीठात बिहारमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. अली अंजार या विद्यार्थ्याने समाजमाध्यमावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे. 
   
अली अंजार हा दरभंगा जिल्ह्यातील कामतौल ब्लॉकमधील बहुआरा गावचा रहिवासी आहे. अली गुरु काशी विद्यापीठातून तो बी. टेक करत आहे. त्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टॅग करून एक चित्रफित पोस्ट केली आहे. त्यामध्ये  त्याने म्हटले आहे की, पंजाबमध्ये हिंदी बोलल्यामुळे बिहारच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. स्थानिक विद्यार्थी आणि नागरिक तलवार घेऊन आमच्या अंगावर धावून येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिसही आमचे ऐकत नाहीत. मारहाण झालेले बहुतेक विद्यार्थी बिहारचे होते. दिवसभर आम्ही वसतिगृहातच राहतो. कपडे आणि हिंदी भाषेबद्दल ऐकताच ते मारहाण करायला सुरुवात करतात. आम्हाला इथे सुरक्षा नाही. दरम्यान, सरकारने बिहारच्या मुलांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी अंजारचा भाऊ मोहम्मद सोहराम याने केली आहे. 

Related Articles