ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार   

पुणे : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने डॉ. केळकर यांची निवड केली आहे. यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
 
यंदा या पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि दोन लाख रुपये रोख रकमेची थैली असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी,  शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदुचे संपादन एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशीलकुमार शिंदे, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, विकास आमटे, आशा भोसले, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, नारायण मूर्ती आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

Related Articles