व्हॉट्सऍप कट्टा   

खरा भक्त
 
देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे परमभक्त. ते सदैव नामस्मरण करत असत. एकदा त्यांच्या मनात आले की मी सदैव देवाचे स्मरण करतो त्याअर्थी सर्वश्रेष्ठ भक्त मीच असणार. ही गोष्ट देवापासून कशी लपणार? 
एकदा देवानेच नारदांना विचारले, माझा सर्व श्रेष्ठ भक्त कोण?  नारद म्हणाले  मीच! देवाने सांगितले नाही. पृथ्वीवरच्या एका छोट्या गावात एक शेतकरी आहे तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. 
नारदाला आश्चर्य वाटले. ते गुप्तरूपाने त्या गावात येऊन शेतकर्‍याच्या सार्‍या दिनक्रमाचे निरिक्षण करू लागले. तो शेतकरी पहाटे लवकर उठे, आंघोळ करून नदीकाठच्या देवळात जाई. देवाला दोन फुले वाहून येई, मग दिवसभर तो कामात मग्न असे. पाणी भरणे, अंगण झाडून काढणे, तुळशीला पाणी घालणे, बैलांना चारा पाणी करणे, गोठ्याची स्वच्छता करणे. मग बायकोने केलेली भाकरी बांधून घेऊन शेतात जाई व दिवसभर कष्ट करी, संध्याकाळी घरी आल्यावर सुध्दा त्याचे काही न काही काम चालतच असे. पण हे सगळे काम करताना तोंडाने नामस्मरण करत असे. 
ते पाहून नारद भगवान विष्णूंकडे जाऊन म्हणाले की, तुमचे म्हणणे खरे वाटत नाही. तो शेतकरी नामस्मरण करतो खरा, पण त्याचे सारे लक्ष दिवसभरातल्या घरच्या कामांतच असते. देवाने नारदास म्हटले की, तुझ्या प्रश्नाचे मी नंतर उत्तर देतो. आधी एक काम कर - ही तेलाने काठोकाठ भरलेली वाटी भगवान शंकराकडे नेऊन दे. पण लक्ष दे, थेंबभर सुध्दा तेल सांडता कामा नये. 
ते काम काही नारदऋषींना अवघड वाटले नाही. ते तेलाची वाटी शंकराकडे पोचवून आले. आल्यावर देवाला सांगितले, की एक थेंब सुध्दा सांडलेला नाही.  देवाने विचारले, पण जाता येता माझे नामस्मरण केले की नाही? नारद म्हणाले  हे कसे शक्य होते? माझे सगळे लक्ष त्या तेलाकडे होते. थोडे जरी दुर्लक्ष झाले असते तर सांडले असते ना!  
देवाने विचारले, मग आता तूच सांग, रात्रदिवस घरातली सगळी कामे करत राहूनही तो माझे नामस्मरण चुकत नाही. तू मात्र छोटेसे काम करताना मला विसरलास. श्रेष्ठ भक्त कोण? 
 
तात्पर्य : देव कधीही कामधंदा सोडून आपली भक्ती करायला सांगत नाही, कर्म करत राहून फक्त नाम स्मरणातून परमार्थ साधता येतो.
******
बायको : अहो, ऐकता का ?
शेजारच्या मुलीला गणितात ९९ गुणे मिळाले...
नवरा : अरे वा! फक्त १ गुण कसा गेला तिचा ?
बायको : तो आपल्या मुलाने मिळवला.

Related Articles