पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलचे दरवाजे बंदच   

नवी दिल्ली : इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या हंगामाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाहत्यांना पाकिस्तानचे खेळाडू या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. मात्र, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. आयपीएलच्या पहिल्या म्हणजेच २००८च्या हंगामानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिले नाहीत. राजकीय तणवामुळे अखेरीस पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. २००८ मध्येच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची पहिली आणि शेवटची संधी मिळाली होती. 
 
आयपीएलच्या पहिल्या हंगामात ८ संघ खेळत होते. त्यापैकी ५ संघांमध्ये पाकिस्तानचे खेळाडू होते. आयपीएल २००८ मध्ये शोएब अख्तर, शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदीसह ११ खेळाडूंना संधी मिळाली होती. केकेआर म्हणजेच शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये सर्वाधिक ४ खेळाडू पाकिस्तानचे होते. यामध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गुल यांचा समावेश होता.
 
२००८ मध्ये कोणत्या संघात कोणते पाकिस्तानी खेळाडू?
 
* केकेआरमध्ये चार खेळाडू - सलमान बट, शोएब अख्तर, उमर गुल आणि मोहम्मद हाफिज
* राजस्तानच्या संघात ३ खेळाडू - सोहेल तनवीर, युनुस खान आणि शोएब मलिक
* दिल्लीच्या संघात २ खेळाडू - मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक 
* डेक्कन चार्जर्स - शाहिद आफ्रिदी
* आरसीबी - मिस्बाह उल हक 
 
तीन संघांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही
 
राजस्तान रॉयल्समध्ये सोहेल तनवीर, कामरान अकमल आणि युनुस खान यांना संधी मिळाली होती. याशिवाय दिल्ली डेअरडेवेल्समध्ये पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली. यामध्ये मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांचा समावेश होता. हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्स आणि आरसीबीमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी खेळाडूला घेण्यात आले होते. हैद्राबादने शाहिद आफ्रिदी आणि आरसीबीने मिस्बाह उल हकला संधी दिली होती. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या तीन संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली नव्हती. 

Related Articles