पाणी जपून वापरा : मोदी   

नवी दिल्ली : पाण्याचा जपून वापर करा, पुढील पिढ्यांना ते मिळावे, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.जागतिक पाणी दिवस काल साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. सरकार पाण्याचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच त्यासाठी विकासात्मक पावले देखील उचलत आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे, ते जपून वापरण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पाण्याचे साठे संरक्षित करा, कारण ते पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. भावी पिढीचा विचार करून जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी एक्सवर केले. संयुक्त राष्ट्राच्या वतीने प्रत्येक वर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक पाणी दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले  आहे. 

Related Articles