मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या बिहारच्या वकिलांवर आरोपपत्र   

नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर प्रकरणी ईडीने शनिवारी बिहारमधील काही वकिलांवर आरोपपत्र दाखल केले आहे. पाटणा येथील रेल्वेच्या लवादाने मृतांच्या वारसांना दिलेली रक्कम वकिलांनी परस्पर हडप केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. 
 
बिद्यानंद सिंह, परमचंद सिन्हा, विजय कुमार आणि कुमारी रिंकी सिन्हा, अर्चना सिन्हा, निर्मला कुमारी आणि हरिजग बिझनेस अँड डेव्हलपमेंट यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए न्यायालयाने  आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. मृतांच्या वारसांच्या नावे असलेली सुमारे १० कोटी २७ लाख रुपयांची रक्कम वकिलांनी परस्पर हडप केल्याचा आरोप आहे. ९०० जणांनी रकमेचा गैरव्यवहार केला होता. त्यासाठी दावेदारांच्या स्वाक्षर्‍या आणि अंगठ्याचे ठसे घेतले होते. दावेदारांच्या नावे बँक खाती उघडली. मात्र, त्याची कल्पना त्यांना दिली नाही. रेल्वेच्या खात्यातून रक्कम वळविली आणि नंतर ती काढून घेतली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. 
 

Related Articles