हिथ्रोमधून विमानसेवा सुरू   

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडन येथील वीज उपकेंद्रातील आगीमुळे हिथ्रोसह अनेक भागांचा वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती. ती शनिवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
युरोपमधील सर्वांत गजबजलेले विमानतळ असलेल्या हिथ्रोचा वीजपुरवठा बंद पडल्याने शुक्रवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. एक हजारांवर विमानांची उड्डाणे रोखली होती. तसेच अनेक विमाने अन्यत्र वळविली होती. सुमारे दहा हजार विमानप्रवासी अडकले होते. वीज उपकेंद्रातील दुर्घटनेमुळे प्रकार घडला होता. सुमारे दीडशे घरांची वीज गायब झाली होती. दरम्यान, ब्रिटिश एअरवेजने सांगितले की, ८५ टक्के विमानसेवा पूर्ववत करण्यात यश आले. शुक्रवारी १ हजार ३०० विमानांची उड्डाणे रद्द झाली होती. सुमारे २ लाखांवर प्रवाशांची कुंचबणा झाली होती.
 

Related Articles