मोबाइल नेटवर्क, विजेसह विकासासाठी एक कोटी   

छत्तीसगढमध्ये नक्षलमुक्त गावांसाठी उपक्रम

रायपूर : जी ग्रामपंचायत गाव नक्षलमुक्त झाले आहे, अशी घोषणा करेल अशा गावांना मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा आणि विकासासाठी एक कोटी रुपये दिले जातील, असे छत्तीसगढ सरकारने जाहीर केले.
 
राज्य सरकारने छत्तीसगढ नक्षलमुक्त करण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत मंत्रिमंडळाने नवीन योजना जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. शरण येणार्‍या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य दिले आहे. गुरुवारी ३० नक्षलवादी कारवाईत ठार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी नक्षलमुक्त गावांसाठी घोषणा केली. नक्षलमुक्त गाव जाहीर झाल्यास गावासाठी मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा आणि विकासासाठी प्रत्येक गावाला एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. एलवाद पंचायत अभियान, असे योजनेचे नाव आहे. दरम्यान, शरण येणार्‍या प्रत्येक नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच मोफत घर, तीन वर्षांसाठी धान्य आणि महिन्याला १० हजार रुपये देण्याची योजना २०२५ नुकतीच जाहीर केली होती. त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. शस्त्रे टाकून समाजाच्या प्रमुख प्रवाहात येणार्‍याला कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माफत घर दिले जाईल. आर्थिक मदत याचा नवीन धोरणात समावेश आहे. कारवाईत हुतात्मा होणार्‍या प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला वीर बलिदान योजनेत पंचायत विभागाकडून १० कोटी दिले जातील. तसेच गाव पातळीवर वीर जवानांचे पुतळे उभारले जाणार आहेत. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ५०० ते ६०० पुतळे उभारले गेले आहेत.  
 

Related Articles