मुंबई : विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आलेल्या महायुतीच्या पाचही आमदारांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सदस्यांची सभागृहाला ओळख करून दिली. भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, तर अजित पवार गटाचे संजय खोडके आणि शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी या महायुतीच्या पाच जणांनी शपथ घेतली. विधान परिषदेचे पाच सदस्य आमदारपदी विधानसभेत निवडून गेले. त्यामुळे या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीसाठी ६ अर्ज आले. यापैकी ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर एका अपक्ष उमेदवाराने आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी दिली नसल्याने त्याचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे पाचही जण बिनविरोध निवडून आले.
Fans
Followers