पूरक पोषण आहार योजना नागरी भागातही राबवणार   

मुंबई : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेप्रमाणेच पूरक पोषण आहार योजनेसाठी निधी वाढवून देण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. तसेच, पूरक पोषण आहार योजना ही आदिवासी विभागाप्रमाणे आता नागरी भागातही राबविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याबाबत केंद्राकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
 
विधान परिषदेत चित्रा वाघ आणि संजय कोडके यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.  राज्यात २०१७ मध्ये अंगणवाडी लाभार्थ्यांना प्रतिदिन ८ रुपये, स्तनदा व गर्भवती मातांसाठी ९.५० रुपये आणि कुपोषित बालकांसाठी १२ रुपये प्रमाणे लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. मात्र, २०१७ नंतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव वाढले असून इंधन, वाहतूक जीएसटी या सर्व बाबींचा विचार करता हा दर परवडणारा नाही. त्यात वाढ करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, त्या लाभार्थ्याना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे वाघ यांनी प्रश्नाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणले. पूरक पोषण आहार आणि अमृत आहार योजना याच्यात तफावत ठेवू नये. त्यास समान निधी देण्यात यावा, अशी मागणीही वाघ यांनी केली.  यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले. तटकरे म्हणाल्या की, अमृत आहार योजना आणि पोषण आहार योजना या दोन स्वतंत्र योजना आहेत. 
 

Related Articles