सह्याद्री बँक गैरव्यवहार दोन महिन्यांत कारवाई करा : राम शिंदे   

मुंबई : माथाडी तसेच हातगाडी खेचणार्‍या कामगारांसाठी स्थापन केलेल्या सह्याद्री बँकेतील गैरव्यवहाराची दोन महिन्यांत चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश सभापती राम कदम यांनी शुक्रवारी दिले. सदस्य विक्रम काळे, श्रीकांत भारतीय, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतलेल्या या लक्षवेधीला उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दोन महिन्यांत कारवाई करून लेखा परीक्षणही करण्यात येईल; तसेच, आवश्यकता भासल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगितले. 
 
दरम्यान, सह्याद्री सहकारी बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने यांच्या विरोधात तक्रारी असून लॉकर्स तसेच फर्निचर खरेदी करणे, नोकर भरती अशा अनेक मुद्यांवर खर्च केला आहे. माथाडी कामगारांची बँक अक्षरशः लुटली असून या बँकेवर १० प्रकारचे आरोप आहेत. यात ८३ अन्वये चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगून देखील तब्ब्ल १९२ दिवस ही कारवाई पडून होती, असे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई कधी होणार असून येथील भ्रष्ट अध्यक्षाला अपात्र घोषित करणार का? त्यांच्यावर फौजदारी खटला भरणार का? असे विचारले असता मंत्री बाबासाहेब पाटील यांनी करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरु असल्याचे सांगत ८३ ची चौकशी करून दोन महिन्यांत कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 
 

Related Articles