बेकायदा विद्यापीठांपासून सावध राहा; युजीसीची सूचना   

तक्रारीसाठी विशेष ईमेल सुविधा

पुणे : विद्यापीठ अनुदान मंडळ (युजीसी) ने अनधिकृरीत्या पदवी प्रदान करणार्‍या संस्थांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, कोणत्याही विद्यापीठाला किंवा संस्थेला यूजीसीची मान्यत नसताना पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही.
 
 बेकायदा संस्थांबाबत कोणाला माहिती मिळाली, त्यांनी र्ीसलरालिऽसारळश्र.लेा या मेलवर तक्रार करावी, असे आवाहन यूजीसीने विद्यार्थ्यांना केले आहे. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्थेची मान्यता तपासावी. अधिकृतपणे केवळ राज्य, केंद्र, प्रांतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली किंवा यूजीसी कायदा १९५६ अंतर्गत मान्यताप्राप्त संस्थाच पदवी देऊ शकतात. बेकायदा विद्यापीठांची यादी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Related Articles