तन्मन श्रीवास्तवची आयपीएलसाठी पंच म्हणून निवड   

मुंबई : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात २००८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात २००८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या हा विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने बाजी मारली होती.
 
अंतिम सामन्यात तन्मन श्रीवास्तव याने भारताकडून महत्वाची खेळी केली होती आणि भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता. तोच तन्मय श्रीवास्तव आता आयपीएलमध्ये पंचांच्या भूमिकेत दिसणार आहे.भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सर्वात मोठी भूमिका तन्मय श्रीवास्तवची होती. तन्मय श्रीवास्तवने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक २६२ धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण ४३ धावांची खेळी केली होती.
 
विश्वचषकातील या चांगल्या कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तन्मय श्रीवास्तवने आयपीएल २००८ आणि २००९ च्या हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
 
तन्मय श्रीवास्तवने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तन्मयने पंचाला सुरुवात केली आणि आता बीसीसीआयचा क्वालिफाई पंच देखील झाला.तन्मय आयपीएल २०२५ मध्ये पंचांच्या भूमिकेत दिसणार याची माहिती उत्तर प्रदेश क्रिकेटने फोटो पोस्ट करत दिली आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम २१ मार्चपासून रंगणार आहे.
 

Related Articles