केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा   

मुंबई : आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होण्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या ही आपली नैतिक जबाबदारी आहे. याचे भान ठेवून आयपीएल सामन्यावेळी सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू या गोष्टींचा प्रचार करणार्‍या जाहिराती दाखवू नयेत, अशी सूचना आयोजकांना देण्यात आली आहे.   
 
यंदाच्या आयपीएल हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे.  त्याआधी आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएलचे अध्यक्ष अरूण धूमल यांना एक धाडण्यात आले आहे. देशातील अनेक तरून क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूना आदर्श मानतात. लोकप्रिय लीगमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या  सिगारेट, अल्कोहोल याचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आरोग्य सेवा महासंचालक  अतुल गोयल यांनी आयपीएल अध्यक्ष अरूण धूमल यांना लहिलेल्या पत्रात म्हटले की, सिगारेटच्या जाहिरातीसह तंबाखू आणि अल्कोहल संदर्भातील सर्व जाहिरातींवर  प्रतिबंध घालणार्‍या नियमांचे आयपीएलने  सक्तीने पालन करावे, स्टेडियममध्ये आणि राष्ट्रीय टेलिव्हिजन प्रसारणा वेळी संबंधित जाहिराती दाखवू नये. स्पर्धेदरम्यान सामन्याच्या ठिकाणी  यासारख्या गाष्टीची विक्री  होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.  खेळाडू किंवा समालोचक यांच्याकडूनही  सिगारेट, तंबाखू किंवा अल्कोहोल यासंदर्भात समर्थन अपेक्षित नाही, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.भारतातच नव्हे आयपीएल स्पर्धा ही जगात भारी ठरली. २२ मार्चपासून जवळपास दोन महिने क्रिकेट चाहत्यांना फ्रँचायझी संघातील लढतींचा आनंद घेता येणार आहे. आयपीएलचा मोठा चाहतावर्ग असून या स्पर्धेला टेलिव्हिजनच्या माध्यमातून मोठा प्रतिसादही मिळतो.  त्यामुळे जाहिरातीतून मोठी कमाईही होते. सरकारच्या भूमिकेमुळे बीसीसीआय आणि आयपीएलला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागू शकतो. 
 

Related Articles