अमेरिकेच्या वस्तूंवरील शुल्क भारत लवकरच कमी करेल   

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास  

न्यूयॉर्क : भारत लवकरच अमेरिकन वस्तूंवर लादलेले आयात शुल्क कमी करेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. तसेच अमेरिका २ एप्रिलपासून भारतावर शुल्क लादणार असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले.  
  
अमेरिकेच्या एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, अमेरिकेचे भारतासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु माझी एकच समस्या आहे, की भारत जगातील सर्वात जास्त शुल्क आकारणार्‍या देशांपैकी एक आहेत. पण मला विश्वास आहे, की भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करतील. २ एप्रिलपासून अमेरिकाही भारताच्या वस्तूंवर आकारणार आहे. भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईईसी) बाबत, ते म्हणाले, की व्यापारात अमेरिकेला नुकसान पोहोचवणार्‍या देशांचा सामना करण्यासाठी हा एक उत्कृष्ट देशांचा समूह आहे. यावेळी त्यांनी चीनचे नाव घेणे टाळले. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौर्‍यात यावरील करारावर स्वाक्षरी केली आहे.
 
युरोपीयन संघाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, आमच्याकडे व्यापारातील भागीदारांचा एक मोठा गट आहे. त्या भागीदारांना आम्ही आमच्याशी वाईट वागू देऊ शकत नाही. अनेक मार्गांनी आपण आपल्या शत्रूंशी आपल्या मित्रांपेक्षा चांगले वागतो. व्यापाराच्या बाबतीत यूरोपीयन संघ आपल्याला अत्यंत वाईट वागणूक देतो, पण यानंतर भारत आणि प्रत्येकजण अमेरिकेचा एक मित्र म्हणून विचार करेल, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

Related Articles