शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या   

वॉशिंग्टन : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय विचार करू शकते. राणा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला हा अर्ज दाखल केला होता, त्यावेळी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तो फेटाळला होता.
 
’भारतात अत्याचार केले जातील’ राणाने भारतात पाठवले जाऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यात यावी, असा मागणी करणारा अर्ज राणा त्याने न्यायालयात दाखल केला होता. जर मला भारतात पाठवले तर तेथे माझा छळ केला जाईल आणि तेथे मी जास्त जिवंत राहू शकणार नाही, असे त्याने आपल्या अर्जात म्हटले होते. मात्र, त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला होता.
   
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने आपल्या अर्जात भारतावर अनेक आरोप केले होते. ह्युमन राइट्स वॉच २०२३ च्या अहवालाचा हवाला देत त्यांनी म्हटले होते, की भारतातील सरकार धार्मिक अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिमांसोबत भेदभाव करते. त्यामुळे मला भारताच्या ताब्यात दिल्यास मी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने माझ्यावर अत्याचार करण्यात येतील.

Related Articles