गाझात पुन्हा इस्रायलचे हल्ले; ८५ पॅलेस्टिनी ठार   

देर अल-बालाह (गाझा पट्टी) : गाझा पट्टीत इस्रायलकडून गुरुवारी रात्रीपासून करण्यात आलेल्या हल्ल्यात ८५ जणांचा मृत्यू झाला. यात महिला व मुलांचा समावेश आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.मंगळवारी सकाळी इस्रायलने युद्धविराम संपुष्टात आणत गाझा पट्टीत जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एकूण ५९२ नागरिक मारले गेले आहेत, असे मंत्रालयाचे अधिकारी जहिर अल-वहिदी यांनी सांगितले.
   
दरम्यान, इस्रायल लष्कराने सांगितले, की गाझा पट्टीत क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. मंगळवारी इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर गाझामधून हा पहिला रॉकेट हल्ला करण्यात आला. मध्यरात्री अनेक घरांवर झालेल्या हल्ल्यात झोपलेली मुले आणि महिलांसह अनेक जण मारले गेले. इस्रायलने मंगळवारी गाझावर पुन्हा प्राणघातक हल्ले सुरू केले. अनेक ओलिसांना मुक्त करण्यात मदत करणारा युद्धविराम करार मोडला. इस्रायलने नव्या लढाईसाठी हमासला जबाबदार धरले आहे. ज्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, त्यात समाविष्ट नसलेल्या नवीन प्रस्तावाला अतिरेकी गटाने नकार दिला. हमासने हा नवीन प्रस्ताव फेटाळल्यानंतर इस्रायलने हल्ले सुरू केले.
   
इस्रायलने मंगळवारी सकाळी गाझा पट्टीत हवाई हल्ले केले, ज्यात महिला आणि मुलांसह ४०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले. हमासने रॉकेट डागले किंवा इतर हल्ले केले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. गुरुवारी पहाटे केलेल्या हल्ल्यांपैकी एक हल्ला अबसान अल-कबीरा गावातील एका घरावर झाला. हे गाव इस्रायलच्या सीमेजवळ खान युनिसच्या बाहेर आहे. हे गाव अशा भागात आहे, ज्याला इस्रायली सैन्याने या आठवड्याच्या सुरुवातीला रिकामे करण्याचे आदेश दिले होते.
 
गावाजवळ असलेल्या ’युरोपियन हॉस्पिटल’ने सांगितले की, या हल्ल्यात १६ जण ठार झाले, यामध्ये बहुतांश महिला आणि मुले आहेत. दक्षिणेकडील रफाह शहरातील युरोपियन हॉस्पिटलने सांगितले की, रात्रभर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना एकूण ३६ मृतदेह मिळाले आहेत, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. खान युनिस येथील नसीर रुग्णालयात सात मृतदेह आणण्यात आले, त्यापैकी चार मृतदेह ’युरोपियन हॉस्पिटल’मध्ये हलवण्यात आले. उत्तर गाझामध्ये, इंडोनेशियन हॉस्पिटलने सांगितले की १९ नागरिकांचे मृतदेह आणण्यात आले आहेत.
 
उत्तर गाझात पुन्हा नाकाबंदी
 
यापुढे पॅलेस्टिनींना दक्षिणेकडून उत्तर गाझामध्ये प्रवेश करू देणार नाही. जानेवारीच्या युद्धविरामा आधी करण्यात आलेली उत्तर गाझाची नाकाबंदी देखील त्याने पुन्हा करण्यात आली आहे. उत्तरेकडे प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी प्रदेशाचा मुख्य उत्तर-दक्षिण महामार्ग वापरण्याविरूद्ध नागरिकांना इशारा दिला आहे. गाझाच्या किनारपट्टीच्या रस्त्याने फक्त दक्षिणेकडील मार्गाला परवानगी दिली जाईल, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.

Related Articles