उजनी धरणात वाळू माफियांविरोधात कारवाई   

पाच बोटी बुडवून नष्ट

इंदापूर, (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व उपविभागीय अधिकारी  बारामती उपविभाग वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या ५ बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या. या कारवाईमध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर, महसूल सहायक बाळासाहेब मोहिते, तसेच इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई व अरुण कांबळे तहसील कर्मचारी संग्राम बंडगर, महसूल सेवक मिलन पवार, अविनाश कुंभार, अविनाश फडतरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील संकेत बाबर यांनी भाग घेतला.

Related Articles