फहीम खान याच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा   

मुंबई : नागपुरातील दंगलींचा कथित सूत्रधार व मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पत्र देखील लिहिले आहे.
 
खान हा नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे. नागपूर पोलिसांनी त्याला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या दंगलीचे बांगलादेश कनेक्शन समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी होत आहे. खान विरोधात अगोदर पासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. फहीम खान मालेगाव येथील कट्टरवादी संघटनांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांत मालेगावात दोन मोठे गैरव्यवहार उघडकीस आले.  मालेगाव येथील सिराज मोहम्मद व मोहम्मद बगाड यांनी ४ विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिल्हा फंडिंग गैरव्यवहार घडविला होता. मालेगाव येथे उशिरा जन्म प्रमाणपत्र गैरव्यवहारही बाहेर आला आहे. शेकडो अपात्र, घुसखोर बांगलादेशी नागरिकांनी यात खोटे दस्ताजेव, कागदपत्रे देऊन प्रमाणपत्र मिळवले. यामध्ये फहीम खानचा समावेश आहे का? याची चौकशी व्हावी, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. 

Related Articles