पेट्रोल वाहनांच्या किमतीत मिळणार इलेक्ट्रिक वाहने   

नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : सहा महिन्यांत देशात पेट्रोल वाहनांच्या किंमतीत इलेक्ट्रिक वाहने मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.  
 
गडकरी यांनी ३२ व्या कन्व्हर्जन्स इंडिया आणि १० व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित केले. ते म्हणाले, भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाला पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे.  चांगले रस्ते बांधून आपण आपला रसद खर्च कमी करू शकतो. दिल्ली-डेहराडून  द्रुतगती महामार्गाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. २१२ किलोमीटर लांबीच्या  या महामार्गाचे बांधकाम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल. सरकारचे धोरण आयात प्रतिस्थापन, किफायतशीरपणा, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उत्पादन आहे. इलेक्ट्रिक  वाहनांचा अवलंब आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य खूप चांगले असून स्मार्ट शहरे आणि स्मार्ट वाहतुकीसाठी सरकार कटिबद्ध आहे.

Related Articles