पिंपरी : पिस्तुल बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी खेड तालुक्यातील मोईगाव येथे करण्यात आली.मोहित तेजबहादूर सिंग (वय २७, रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष वायकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोई गाव येथील फलके वस्ती येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार किमतीचे एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
Fans
Followers