नगर रचनाकारला लाच घेताना पकडले   

बारामती, (प्रतिनिधी) : बारामती शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने धाव घेतली होती. लाचेची रक्कम ढेकळे यांनी बारामती शहरातील एका खाजगी जिममध्ये दिनांक १९ मार्च रोजी देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस हवालदार किरण चिमटे, महिला पोलिस शिपाई कोमल शेटे, चालक पोलिस शिपाई दीपक दिवेकर आदींच्या पथकाने सापळा लावला आणि नेमका लाच घेणारा मासा त्या सापळ्याच्या गळाला लागला. 

Related Articles