बीसीसीआयकडून आयपीएलच्या नियमात बदल   

कोलकाता : आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. २२ मार्चला कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने एक महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. आयपीएलमधील मुंबई इंडीयन्ससह सर्व १० संघांच्या कर्णधारांची मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने एका नियमाबाबत प्रस्ताव ठेवला आणि यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. सहसा कर्णधारांची बैठक पहिला सामना ज्या ठिकाणी असतो, तेथे होते. पण यंदा ही बैठक बीसीसीआय कार्यालयात घेतली गेली. त्यामुळे एखादी महत्त्वाची घोषणा होणार याची कल्पना होतीच. त्यानुसार, बीसीसीआयने एक महत्त्वाचा नियम बदलला.सर्व कर्णधारांची बैठक आज मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झाली. आयपीएल संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त, फ्रँचायझींचे व्यवस्थापक देखील या बैठकीला उपस्थित होते. यंदाच्या हंगामापासून चेंडूची चकाकी कायम ठेवण्यासाठी थुंकी किंवा लाळ लावण्यावरील बंदी उठण्याचा प्रस्ताव सर्व कर्णधारांपुढे ठेवण्यात आला. बोर्डाच्या या प्रस्तावावर बहुतांश कर्णधारांनी होकार दिला.

Related Articles