रियान पराग राजस्तान रॉयल्सचा कर्णधार   

मुंबई : आयपीएल २०२५ चा हंगाम २२ मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी राजस्तान रॉयल्सने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ च्या आधी राजस्तान रॉयल्सने संघात मोठा बदल केला आहे. रियान परागला कर्णधार बनवण्याचा निर्णय राजस्तान रॉयल्सने घेतला आहे. राजस्तानने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने देखील पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व दिले आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे सूत्रे सांभाळेल.
 
राजस्तान रॉयल्सने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान परागकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. या तीन सामन्यात संजू सॅमसन संघात फक्त फलंदाज म्हणून खेळेल. गेल्या काही आठवड्यांपासून बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला संजू सॅमसन अद्याप त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून संजू सॅमसनला फलंदाजीची परवानगी मिळाली आहे पण यष्टीरक्षणासाठी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे राजस्तानच्या व्यवस्थापनाने रियान परागला पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व देण्याचे ठरवले आहे.
 
पहिल्या तीन सामन्यांसाठी रायनला कर्णधारपद मिळाले आहे. राजस्तान रॉयल्स संघाचा पहिला सामना हैदराबादशी आहे. हा सामना २३ मार्च रोजी खेळवला जाईल. यानंतर, राजस्तानचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. हा सामना २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे खेळला जाईल. तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्जशी आहे. हा सामना ३० मार्च रोजी खेळला जाईल.आयपीएलच्या २०२५ च्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला खेळता येणार नाही. त्यामुळे एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधार सुर्यकुमार यादव सांभाळताना दिसताना दिसेल. आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिक पांड्यावर वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. 
 
एमआय संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नसल्याने आयपीएल २०२५ च्या हंगामापर्यंत बंदी कायम राहील. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिकला आयपीएल २०२४ मध्ये तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आला होता. लीगच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा संघ एका हंगामात तीन वेळा आवश्यक ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, तेव्हा कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. 

Related Articles