अँड्र्यू ब्राऊनली यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण   

फॉकलँड : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० पेक्षा जास्त वय असलेले फार कमी खेळाडू आहेत. चाळीशीच्या आसपास आलेले असताना अनेक खेळाडू क्रिकेटमधून संन्यास घेतात. जगभरात अनेक लीग खेळवण्यात येतात. यामध्ये चाळीशी ओलांडलेले अनेक खेळाडू खेळतात. मात्र, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. या दरम्यान, एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 
 
ओसमान गोकरचा रेकॉर्ड मोडित, त्यांनी केले होते. ५९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फॉकलँड  आयलँड आणि कोस्टा रिका दरम्यान खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात या खेळाडूने पदार्पण केले. मीडिया रिपोर्ट्नुसार सामना १० मार्च रोजी खेळवण्यात आला होता. हा फॉकलँड  आयलँड चा पहिला सामना होता. या सामन्यात अँड्र्यू ब्राऊनली यांनी वयाच्या ६२ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते सर्वात जास्त वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी खेळाडू ठरले आहेत. त्यांनी ओसमान गोकरचा विक्रम मोडला. ओसमान गोकरने २०१९ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाची ६० वर्षे उलटल्यानंतर पदार्पण करणारे ब्राऊनली पहिले खेळाडू ठरले आहेत. अँड्र्यू ब्राऊनली यावेळी तीन टी २० सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात १० क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ब्राऊनली यांनी पहिल्या सामन्यात १ तर दुसर्‍या सामन्यात २ आणि तिसर्‍या सामन्यात ३ धावा केल्या आहेत

Related Articles