व्हॉट्सऍप कट्टा   

एक ऋषी अनेक वर्षांपासून यज्ञ करायचा प्रयत्न होते; परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमाजवळून एकदा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासीनता पहिली आणि म्हणाले.  ’ऋषिवर! तुम्ही असे उदास का? राज्यात कोणी निराश आणि उदास राहिलेलं मला योग्य वाटत नाही.’ त्यावर ऋषी म्हणाले, महाराज! मी बर्‍याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे; पण अपेक्षित अग्नी माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही.’ त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले, ’एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो की, आज संध्याकळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन.’ यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्नीदेव प्रकट झाले. अग्नीदेव राजांना म्हणाले, ’मी तुझ्यावर प्रसन्न आहे! वर माग!’ त्यावर राजा म्हणाले, ’या ऋषींची इच्छा पूर्ण करा! यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!’ यावर ऋषी म्हणाले, ’राजा! मी अनेक प्रयत्न केले; पण मला शक्य झाले नाही. तुम्ही अग्निला प्रकट कसे केले?’ यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उतरले, ’ऋषीवर! राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतु नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो.’
 
तात्पर्य : संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.
--------
जोपर्यंत आपण स्वतःच्या मनात पराभवाचा विचार करत नाही, तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. यश आणि अपयश यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे मानसिकता. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्न करण्याची तयारी हेच खरे विजेतेपदाचे गमक आहे. अनेकदा संकटे, अडथळे आणि अपयश येतात, पण त्यांच्याकडे शिक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातून नवी उमेद आणि अनुभव मिळतो. ज्या क्षणी आपण हार मानतो, त्या क्षणीच आपण खरोखर हरतो. पण जर आपण मनाशी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न सोडायचे नाहीत, तर यश अवश्य मिळते. आत्मशक्तीवर विश्वास ठेवणे, सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि कठीण प्रसंगांमध्येही धैर्य दाखवणे हे जिंकण्याचे सूत्र आहे. म्हणूनच, आपण जिंकणार आहोत हे मनाशी पक्के ठेवा, कारण मानसिक बळ हीच खरी शक्ती आहे!
---------
मन्या : काय रे गण्या, काय झालं?
गण्या : आज बँकेतून फोन आला होता. 
मन्या : मग काय झालं?
गण्या : म्हणत होते, सर! तुमच्या खात्यात इतके पैसे आहेत, 
त्यासाठी खातं उघडायची काय गरज होती?
सर! तुमच्या घरात एखादा छोटा-मोठा डब्बा नाहिये का?
त्यात ठेवायचे होते.
---------

Related Articles