केनेडी यांच्या हत्येच्या हजारो फाइल्स सार्वजनिक   

६० लाख पानांचा दस्तावेज खुला

डल्लास : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या ह्त्यसंदर्भातील गोपनीय कागदपत्रांच्या फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकराने फाइल आता खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केनेडी यांच्या हत्येचे रहस्य उलघडण्यास अधिक मदत मिळणार आहे. 
 केनेडी यांची हत्या २२ नोव्हेंबर १९६३ मध्ये झाली होती. त्याबाबतच्या गोपनीय फाइल आहेत  संकेतस्थळावर सुमारे १ हजार १२३ फाइल्स टाकल्या आहेत. सुमारे ६० लाख कागदपत्रे आहेत. छायाचित्र, चित्रफिती, ध्वनीफिती आणि हत्येसंदर्भात पूर्वी जाहीर केलेल्या कागदपत्रांचा त्यात समावेश आहे. 
 
अमेरिकेतील राष्ट्रीय अभिलेखागार विभागकडचे सर्वात अधिक दस्तऐवज त्यात तआहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जॉन एफ केनेडी सेंटरला भेट दिली. तेव्हा त्यांनी सांगितले की, प्रशासन ८० हजार फाइल्स सार्वजनिक करणार आहे. त्यापैकी लाखो पाने अगोदरच सार्वजनिक झाली असतील. पानांची संख्या अफाट आहे. त्यामुळे ती वाचण्याची संधी तुम्हाला मिळेल. संशोधकांच्या मते ३ हजार फाइल्स सार्वजनिक केलेल्या नाहीत. एफबीआयने सांगितले की, हत्येसंदर्भात माहिती देणारे २ हजार ४०० नव्या नोंदी मिळाल्या आहेत. 

Related Articles