उर्जा केंद्रांवरील हल्ले तातडीने थांबविण्याचा निर्णय   

पुतीन -ट्रम्प यांच्यातील चर्चेचे फलित 

वॉशिग्टन : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धबंदी व्हावी, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमधील उर्जानिर्मिती ठिकाणे आणि पायाभूत सुविधांवर हल्ले तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. किमान ३० दिवस हल्ले केले जाणार नाहीत, या बाबीला  पुतीन मान्यता दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
 
पुतीन यांनी यापूर्वी ३० दिवसांच्या युद्धबंदीला विरोध केला होता. मात्र, त्यांनी आता एक पाऊल मागे घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाहट हाऊसने निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, शांततेच्या दिशेनेहालचाल सुरू झाली आहे. काळ्या समुद्रातील हल्ले आणि संपूर्ण युद्ध थांबविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पश्चिम आशियातही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल.  दरम्यान, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात चर्चा सुरु असताना युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने हवाई हल्ले केले. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन स्थानिक अधिकार्‍यांनी केले. 
 
दरम्यान, युक्रेनने युद्धबंदी योजनेवर कोणतीही तातडीने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अध्यक्ष झेलन्स्की यांनी ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी देखील काळ्या समुद्रात लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचे हल्ले थांबवावेत, कैद्यांची सुटका करावी, असा प्रस्ताव सौदी अरेबियात अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत मांडला होता. ट्रम्प यांनी पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, ऊर्जा आणि पायाभूत ठिकाणांवरील हल्ले तातडीने थांबविण्यावर पुतीन राजी झाले आहेत. आता कायमस्वरुपी युद्धबंदीसाठी आम्ही तयारी करत आहोत. 

Related Articles