उष्णतेच्या लाटेचा समावेश   

आपत्ती व्यवस्थापनात करा

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेचा समावेश आपत्ती व्यवस्थापन योजनेत करावा, अशी शिफारास संसदीय समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. गृह व्यवहारच्या स्थायी समितीशी संबंधित संसदीय समितीने राज्य सभेत गेल्या आठवड्यात एक अहवाल दिला. त्यात म्हटले की, उष्णतेच्या लाटेचा समावेश आपत्ती व्यवस्थापन यादीत करावा. भाजपचे राज्यसभेचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ३२ सदस्यांची समिती आहे. त्या समितीने बदलत्या वातावरणानुसार आपल्या शिफारसी केल्या आहेत. त्यात उष्णतेच्या लाटेचा समावेश आपत्ती व्यवस्थापन योजनेत करण्याचा आग्रह धरला आहे. आपत्ती रोखणार्‍या संस्थांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. त्यामध्ये रुग्णालये, शाळा आणि वाहतूक यंत्रणा यांचा समावेश आहे. 

Related Articles