आयात पोलादाच्या उत्पादनांवर १२ टक्के कर   

नवी दिल्ली :  परदेशातून आयात होणार्‍या पोलाद उत्पादनांवर २०० दिवसांसाठी १२ टक्के कर लागू करण्याची शिफारस व्यापार उपाय महासंचलनालयाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला केली आहे.  देशांतर्गत उद्योगांच्या सुरक्षेसाठी ती केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 
व्यापार उपाय महासंचलनालय व्यापाराचा अभ्यास आणि तपास करणारी एक संस्था आहे. किंबहुना ती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा उजवा हात आहे. संंस्थेला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिसून आले की, परदेशातून गैर मिश्र आणि मिश्र पोलादाची उत्पादने मोठ्या प्रमाणात देशात आयात केली जात आहेत. त्यामध्ये उद्योगांसाठी आवश्यक पोलाद, पाइप निर्मिती यंत्रे, बांधकाम, भांडवली वस्तू, वाहन, ट्रॅक्टर, दुचाकी अणि इलेक्ट्रिकल पॅनेलसाठी लागणार्‍या भागांचा समावेश आहे.  त्यामुळे देशांतर्गत पोलाद उत्पादनांचे आणि उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी महासंचलनालयाने १२ टक्के आयात कर लागू करण्याची शिफारस मंत्रालयाला केली आहे. 
 
दरम्यान, इंडियन स्टील इंडियाचे सदस्य अर्सेलोर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया, एएमएनसएस खोपोली, जेएसडब्लू स्टील, जेएसडब्लू स्टील कोटेड प्रॉडक्ट, भूषण पॉवर अँड स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने परदेशातून पोलादांची उत्पादने मोठ्या प्रमाणात आयात केली जात असल्याची तक्रार  व्यापार उपाय महासंचलनालयाकडे केली होती. त्यानुसार देशांतर्गत उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी १२ टक्के आयात कर लागू करण्याची शिफारस करण्यात आली. सुमारे २०० दिवस ता लागू केला जाणार आहे. महासंचलनालयाने ८ मार्च रोजी सूचना काढली. त्या म्हटले आहे की, पोलाद उत्पादनांच्यात आयातीचे प्रमाण प्रचंंड वाढले आहे. भविष्यात ते सुरूच राहिले तर देशातील उत्पादनांचे संरक्षण होणे अधिक अवघड होणार आहे. 

Related Articles