शेतकरी नेत्यांबरोबर केंद्र सरकारची चर्चा   

चंडीगढ : शेतमालाला किमान हमी भाव द्यावा, यासह विविध मागण्यांबाबत शेतकरी नेत्यांशी केंद्र सरकारने बुधवारी चर्चेस प्रारंभ केला. शेतकरी नेते आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधींमध्ये कालपासून नव्याने चर्चेस प्रारंभ झाल आहे. केंद्राच्या प्रतिनिधींमध्ये केद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे. ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन येथे चर्चेसाठी काल सकाळी आले. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चिमा आणि कृषी मंत्री गुरमित सिंह खुद्दीन बैठकीसाठी आले आहेत. शेतकरी नेते श्रवन सिंग पंधेर म्हणाले संयुकत किसान मोर्चा (अ राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाचे २८ प्रतिनिधी चर्चेत भाग घेणार आहेत. 

Related Articles