औरंगजेबाच्या कबरीवरून वाद; समाजमाध्यमावरील ५०६ पोस्ट हटवल्या   

आठ जणांविरोधात कारवाई

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद उफाळला असून, पोलिसांनी समाजमाध्यमावर करडी नजर ठेवली आहे. कबरीवरून समाजमाध्यमावर करण्यात आलेल्या ५०६ वादग्रस्त पोस्ट पोलिसांनी हटवल्या असून, ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावरील पोस्ट तपासणीसाठी शहरात १० आणि ग्रामीण भागात ८ पोलिस २४ तास तैनात करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यावर सिटी चौक, जिन्सी, जवाहरनगर, सिडको, वाळूज एमआयडीसी या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
’छावा’ चित्रपटाचे पोस्टर लावून संभाजीनगरमधील दोन तरुणांनी मंगळवारी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. जोहेब शोएब पठाण आणि तौफिक अहमद इद्रीस या २ तरुणांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. विक्रोळीमधील पार्कसाईट पोलिसांनी अरबाज खान नावाच्या तरुणाला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती.

Related Articles