कोकण रेल्वे महामंडळ लवकरच भारतीय रेल्वेत   

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ लवकरच भारतीय रेल्वेत समाविष्ट होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार मान्यता देईल. मात्र, या रेल्वेचे नाव कोकण रेल्वे राहावे, यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत सांगितले.
 
आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक मर्यादांमुळे मार्गांचे दुहेरीकरण करू शकत नाही. स्थानकांमध्ये दिल्या जाणार्‍या सुविधा, नवीन स्थानके बांधणे यांसारखे कामे होत नाहीत. शिवाय, कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय अंदाजपत्रकात स्थान मिळत नसून, पायाभूत विकास कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे राज्य सरकार भारतीय रेल्वेकडे कोकण रेल्वेच्या विलगीकरण संदर्भात मान्यता देणार का? अशी लक्षवेधी दरेकर यांनी मांडली.

Related Articles