शेतकर्‍यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकर्‍यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकर्‍यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम ३१ मार्चपर्यंत दिली जाईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी वरील चर्चेच्यावेळी सांगितले.
 
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पीक विम्याची रक्कम मिळावी, या संदर्भात सदस्य राजेश विटेकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राहुल पाटील व सई डहाके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. यावेळी राज्य सरकार शेती व शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून मंत्री कोकाटे यांनी सांगितले.नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस व पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीने देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी २१९७ कोटी भरपाई मंजूर झाली आहे.

Related Articles