मुंबई : महाराष्ट्र सेवा नियम जुना असून या जुन्या नियमांत बदल करून समाज माध्यमांवरील कर्मचारी-अधिकार्यांची वर्तणूक, त्याचा उपयोग आदी बाबतीत नवे नियम करण्यात येणार आहेत. त्या नियमांचा सेवा शर्थीच्या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात येईल. या सर्वांचा शासकीय आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत लक्षवेधी दरम्यान बुधवारी दिली. मात्र, कर्मचार्यांचे बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नसून यात आवश्यक असेल तिथे आयएचा वापर देखील करण्याचा विचार असल्याचे फडणवीस म्हणाले.आमदार परिणय फुके यांनी शासकीय कर्मचार्यांचा समाज माध्यमाचा वापर वाढला असून त्या विरोधात कोणावर कारवाई झाली तसेच प्रतिबंधासाठी नवीन नियम करणार का? असा प्रश्न विचारला. यावर फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र सेवा नियम जुना असून तो तत्कालीन नियमानुसार आहे.
Fans
Followers