शहरात रंगपंचमी उत्साहात   

पुणे : सप्तरंगांची उधळण करीत...रंगांनी भरलेल्या हौदात खेळून, चिमुकल्यांसह तरुणाईने आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतला.  गुलाल आणि रंग एकमेकांना लावत रंग, आनंद आणि उत्साहाने नटलेला आनंद सोहळा पुणेकरांनी यावेळी अनुभवला.अखिल मंडई मंडळाच्या वतीने रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, राजेश कराळे उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने यांच्यासह विविध गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी रंगोत्सवात सहभाग घेत आनंद लुटला. 
 
अण्णा थोरात म्हणाले, फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू झालेल्या वसंतोत्सवाची सांगता रंगपंचमीच्या पाचव्या दिवशी होते. याच दिवशी परंपरेनुसार रंग खेळण्याची प्रथा आहे. मात्र, सध्या होळीच्या दिवशीच रंग खेळण्याची नवी परंपरा रुजू होत असल्याचे दिसून येते. तरीही, पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी उत्साहात रंगपंचमीचे आयोजन केले जाते.

Related Articles