नागपूर दंगलीत समाजमाध्यमांचा मोठा वाट   

समाजमाध्यमांवर तब्बल २३४ पोस्ट्स 

नागपूर : नागपुरात औरंगजेबाच्या कबरी वरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मोर्चानंतर नागपूरमध्ये दोन गटात दगडफेक झाली .दगडफेकीत गर्दी आवरताना पोलीस आणि नागरिक जखमी झाले . नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा ठपका असणाऱ्या फहीम खानसह ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात मोठी बाब समोर आली आहे . नागपूरची दंगल २३४ पोस्टमधून घडवून आणल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे .या संदर्भात नागपूर पोलिसांनी चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. देशद्रोहाची कारवाई झालेला फहीम खान यानेही हिंसा भडकवण्यात प्रमुख भूमिका पार पाडली असल्याचे समोर येत आहे.तोच मास्टरमाईंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर पोलीस सायबर सेलचे प्रमुख लोहित मतांनी यांनी सांगितले .
 
नागपूरमध्ये उफाळलेल्या दंगलीमागे हिंसा भडकवण्याचे काम वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या वापरकर्त्यांकडून करण्यात आले आहे. २३४ पोस्टच्या माध्यमातून हे दंगल घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडे आहे.या संदर्भात नागपूर पोलिसांनी चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली .फहीम खान ने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसा भडकवणाऱ्या पोस्ट केल्याचे उघड झाले आहे .फहीम खान याने हिमसा भडकवण्यात प्रमुख भूमिका पार पाडली .तोच मास्टर माइंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर सायबर सेलचे प्रमुख रोहित मताने यांनी सांगितले .फहीम खानच्या बांगलादेश कनेक्श बाबत  तपास केला जात असल्याचेही रोहित मतानी म्हणाले .
 
नागपूरच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवलेले फेसबुक खाते ही ओळखल्याने नागपूरच्या दंगलीचे आणि बांगलादेशचे कनेक्शन असल्याचे समोर आले . समाज माध्यमांचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठी होत नसून त्यावर अफवाही पसरवल्या जात आहेत त्यामुळे सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधून संबंधित खाती ब्लॉक करण्याची विनंती केली .तब्बल २३४ पोस्टवरून  हिंसा भडकवण्याचे काम झाल्याचे सायबर सेलने म्हटले आहे .याबाबत अधिक तपास सुरू आहे 

Related Articles