केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी संकेतस्थळावर देता येईल का?   

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

नवी दिल्ली :  केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी संकेतस्थळावर देता येणे शक्य आहे का ?, असा प्रश्न सर्वोॅच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मंगळवारी विचारला आहे. तसेच अर्जदारांना दहा दिवसांत मतदान समितीसमोर निवेदन करण्यास सांगितले.
 
सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि केव्ही. विश्वनाथ यांनी अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेतली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि गैरसरकरी संस्थेने अर्ज केले होते. त्या म्हटले होते की, लोकसभा आणि विधानसभेचे मतदान झाल्यानंतर ४८ तासांत केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी आयोगाने टाकावी. 

Related Articles