कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत समाविष्ट होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   

मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ लवकरच भारतीय रेल्वे महामंडळात समाविष्ट होणार आहे. यासाठी राज्य सरकार मान्यता देईल केवळ या रेल्वेचे नाव कोकण रेल्वे राहावे यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. 
 
आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक मर्यादांमुळे मार्गांचे दुहेरीकरण करू शकत नाही स्थानकांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा ,नवीन स्थानके बांधणे यांसारखे कामे होत नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असल्यामुळे कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळत नसून पायाभूत विकास कामांना खीळ बसले आहे. त्यामुळे राज्य सरकार भारतीय रेल्वेकडे कोकण रेल्वेच्या विलगीकरण संदर्भात मान्यता देणार का अशी लक्षवेधी दरेकर यांनी मांडली.
 
या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,कोकण रेल्वे ही चार राज्यांच्या मंजूर नुसार एक महामंडळ तयार करण्यात आले आहे .कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी तीन राज्यांनी मान्यता दिली आहे. कोकण रेल्वे मध्ये अतिरिक्त गुंतवणूक होणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे सातत्याने तोट्यात असल्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयामध्ये बऱ्याच बैठका झाल्या असून रेल्वे मंत्रालयाने विलगीकरणाला मान्यता दिली आहे त्यानुसार तीन राज्यांनी वेगळे करण्याच्या प्रस्ताव पाठवले आहेत. महाराष्ट्र राज्यातून सुद्धा कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. केवळ या रेल्वेचे नाव कोकण रेल्वेच राहावे याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय विनंती करण्यात येणार आहे. 
 

Related Articles