औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचे संरक्षण : उद्धव   

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात असमर्थता दाखवली आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. तो महाराष्ट्रातील मातीला जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही, असेही उद्धव म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौर्‍यात नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माफी मागितली होती, असा दावा केला आहे. याबाबत पत्रकारांनी उद्धव यांना विचारले. त्यावर, उद्धव म्हणाले, होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलेच नाही. चला, जय हिंद, असे एका वाक्यात उत्तर दिले. 

Related Articles