घाऊक महागाई दर २.३८ टक्के   

नवी दिल्ली : घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई दर फेब्रुवारी महिन्यात २.३८ टक्के नोंदविला गेला. खाद्यपदार्थाच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याने घाऊक महागाईत वाढ झाली.जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर २.३१ टक्के होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये हा दर ०.२ टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (सीपीआय) दर सात महिन्यांनंतर फेब्रुवारीत चार टक्क्यांखाली आला होता. फेब्रुवारीत हा दर ३.६१ टक्के नोंदविला गेला. जानेवारी महिन्यात हा दर ४.२६ टक्के होता. खाद्यपदार्थ महागाई फेब्रुवारी महिन्यात ८.८९ टक्के नोंदवली गेली. जानेवारीमध्ये खाद्यपदार्थ महागाई ७.४७ टक्के होती. उत्पादित खाद्यपदार्थाच्या महागाईतही वाढ पाहायला मिळाली. 

Related Articles