नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी जयमाल्य बागची यांनी सोमवारी शपथ घेतली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांना शपथ दिली. बागची कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठ आणि मुख्य न्यायाधीश होते. त्यांना आता सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात अन्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत बागची यांचा शपथविधी सोहळा काल झाला. त्यामुळे न्यायमूर्तींची सख्या आता ३३ झाली आहे. न्यायाधीशांची मंजूर संख्या ३४ आहे. बागची पुढील सहा वर्षे कार्य करणार असून भविष्यात ते सरन्यायाधीश होतील. बागची यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. भावी सरन्यायाधीश के. व्ही.. विश्वनाथन यांचा कार्यकाळ २ ऑक्टोबर २०३१ पर्यंत आहे.
Fans
Followers