चार छाव्यांसह गामिनी अधिवासात   

कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या २६ वर

श्योपूर : मध्य प्रदेेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिवासासात चित्तीण गामिनी आणि तिच्या चार छाव्यांना सोमवारी सोडण्यात आले. त्यामुळे अधिवासात सोडण्यात आलेल्या चित्त्यांची संख्या आता १७ झाली असून नऊ मादी चित्ते अजूनही बंदिस्त ठिकाणी वावरत आहेत. गामिनीला दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. चार छावे १२ महिन्यांचे आहेत.  त्यामध्ये दोन नर आणि दोन माद्या आहेत. श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाचा जंगली अधिवास खाजुरी येथे त्यांना काल सोडण्यात आले. 
 
जंगलाच्या अहेरा पर्यटन पट्ट्यात पाचही जणांचा वावर राहणार आहे. अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. कुमार शर्मा यांनी दिली. पर्यटन पट्टयात चित्त्यांचा वावर राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना त्यांचे दर्शन सहज होण्यास मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता जंगली अधिवासात १७ चित्ते आहेत. त्यामध्ये भारतात जन्मलेल्या ११ छाव्यांचा समावेश आहे. सर्व चित्त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, अधिकार्‍यांनी सांगितले की, १० मार्च २०२४ रोजी गामिनीने सहा छाव्यांना जन्म दिला होता. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ११ फेब्रुवारी रोजी चित्तीण जलवा आणि तिच्या चार छाव्यांना अधिवासात सोडले होते. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्सवर पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची संख्या वाढत चालली आहे.  त्यामुळे पर्यटक परिसरात आकर्षित होत आहेत. चित्ते पाहण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळणार आहे. 
 
चित्ता प्रकल्प
० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कुनो राष्ट्रीय उद्यानात देशातील पहिला चित्ता संवर्धन प्रकल्प १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाला. 
० पहिल्या टप्प्यात नामेबियातून आठ चित्ते भारतात आणले होते. त्यात पाच माद्या आणि तीन नर होते. 
० दुसर्‍या टप्प्यात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले होते.
० सध्या २६ चित्ते आहेत. त्यात देशात जन्मलेले १४ छावे आहेत.
० जंगलाच्या अहेरा पर्यटन पट्ट्यात पाचही जणांचा वावर राहणार आहे. अधिवासात १७ चित्ते आहेत. त्यात दोन माद्या आणि छावे आहेत.
० नऊ माद्या सध्या बंदिस्त जागेत आहेत.  
० भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे संवर्धन व्हावे, त्यांची संंख्या देशात  वाढावी, यासाठी प्रकल्प राबविला जंगल सफारी आणि पर्यटनाला चालना मिळणार 
 आहे. 

Related Articles