बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एनडीएचे सरकार येणार : सिग्रीवाल   

नवी दिल्ली : यंदा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा येईल, असा दावा भाजपचे खासदार जनार्दनसिंह सिग्रीवाल यांनी सोमवारी लोकसभेत केला.
 
२०२५-२६ साठी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना भाजप खासदार सिग्रीवाल म्हणाले, बिहारमध्ये रेल्वेचा सर्वांगीण विकास झाला असल्याने किती कामांवर बोलावे, असा प्रश्न मला पडला आहे. रेल्वेमध्ये कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा वाढविण्यासाठी २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. विमानतळापेक्षा सुविधा आणि स्थानके चांगली करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने केले आहे. बिहारच्या उत्तर आणि दक्षिणेला जोडण्याचे काम रेल्वेने केले आहे.   मलेशियासारख्या देशाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्याएवढी १,८३२ किलोमीटर ची नवीन रेल्वे लाइन बिहारमध्ये २०१४ पासून टाकण्यात आली आहे. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत, दिखाव्यासाठी काम करत नाही. बिहारला बहार आली असून, २०२५ मध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात एनडीएचे सरकार येईल. 
 
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असून,  जेडीयूचे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार राजदप्रणित महाआघाडीचे आव्हान झुगारून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहे.

Related Articles