विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध होणार   

राष्ट्रवादीकडून खोडके, शिंदेसेनेकडून रघुवंशी यांना संधी

मुंबई, (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे सोमवारी स्पष्ट झाले. महायुतीच्या पाच उमेदवारांव्यतिरिक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला असला तरी त्यावर सूचक, अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या स्वाक्षर्‍या नसल्याने तो छाननीत बाद ठरणार हे नक्की आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संजय खोडके यांना संधी दिली असून त्यांच्या पत्नी विधानसभेच्या सदस्या आहेत. पती-पत्नी एकाच वेळी विधीमंडळाचे सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे.भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड तसेच, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पाच विधानपरिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पाच  जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होत आहे.

Related Articles