E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आठवडाभरात नवे वाळू धोरण जाहीर करणार
Wrutuja pandharpure
18 Mar 2025
बावनकुळे यांची घोषणा
मुंबई
, (प्रतिनिधी) : राज्य सरकारचे नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली. वाळू धोरणानुसार, नागरिकांचा वाळूसाठी अर्ज आल्यानंतर पुढील १५ दिवसांत वाळू उपलब्ध करून न दिल्यास संबंधित तहसीलदारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी सोमवारी भंडारा जिल्ह्यातील वाळू उपशाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी चर्चेला उत्तर देताना बावनकुळे यांनी नव्या वाळू धोरणाची माहिती दिली. या धोरणामुळे राज्यातील नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. वाळू धोरणाबाबत आत्तापर्यंत २८५ सूचना आल्या असून त्यासाठी इतर राज्यातील वाळू धोरणांचा अभ्यास केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
नव्या धोरणात दगडांपासून केलेली वाळू मोठ्या प्रमाणात वापरायची आहे. त्यासाठी क्रशर्संना उद्योगाचा दर्जा देऊन अनुदान देणार येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. नव्या वाळू धोरणामुळे याआधीचे धोरण रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या वाळू धोरणात नागरिकांना तक्रारी करण्यासाठी पोर्टल तयार केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय हरित लवादाच्या धोरणानुसार सक्शन पंप लावून वाळू उपसा करता येत नाही. सक्शन पंप लावून वाळू उपसा करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कोकणात सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असेल तर याबाबत कोकण विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या जातील. तसेच, संबंधित तहसीलदारांना कारवाई केली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. वन विभागाच्या धर्तीवर बेकायदा रेती वाहतूक करणारी वाहने सरकार जमा करण्याची मागणी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गौण खनिज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ
शहरातील इमारतीच्या पायांचे खोदकाम करताना त्याच ठिकाणी गौणखनिजाचा वापर करावयाचा असेल तर रॉयल्टी भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, दुसर्या जागेवर गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरावी लागेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
Related
Articles
प्रश्न ‘बेहिशेबी’ पैशाचा...!
16 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
नागपुरात जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक
18 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
रंग टाकल्याचा जाब विचारला, मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
प्रश्न ‘बेहिशेबी’ पैशाचा...!
16 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
नागपुरात जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक
18 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
रंग टाकल्याचा जाब विचारला, मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
प्रश्न ‘बेहिशेबी’ पैशाचा...!
16 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
नागपुरात जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक
18 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
रंग टाकल्याचा जाब विचारला, मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
प्रश्न ‘बेहिशेबी’ पैशाचा...!
16 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
नागपुरात जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक
18 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
रंग टाकल्याचा जाब विचारला, मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?