मद्य पिण्यासाठी नकार दिल्याने मित्रांनी पेटवल्या दुचाक्या   

कोथरूडमधील प्रकार

पुणे : एका मित्राला त्याच्या पत्नीने मित्रांसोबत मद्य पिण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी रागाच्या भरात त्याची दुचाकी पेटवली. या आगीत पार्किंगमधील इत्तर दुचाकी वाहने सुध्दा जळून खाक झाल्या. हा धक्कादायक प्रकार कोथरूडमधील राऊतवाडी व हनुमान नगर येथे घडला आहे. या आगीत अनेक दुचाकी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी परिसरात आरोपी मित्र कणही ठाकूर आणि हिरालाल शर्मा सुध्दा वास्तव्यास आहेत. तिघेही केवळ मित्र नसून नातेवाईक सुध्दा असल्याची माहिती  आहे. 
 
धुळवडीच्या दिवशी दोन्ही आरोपी मित्रांनी शिबुकुमारला मद्य पिण्यासाठी बोलावले. पण त्याने मित्रांना नकार दिला. तसेच, पत्नी मद्य पिण्याची परवानगी देत नसल्याने मी येणार नाही, असे सांगितले. शिबुकुमारने मित्रांना नकार देत घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ होऊनही शिबुकुमार घराबाहेर न आल्याने या दोघांनाही त्याचा प्रचंड राग आला. शिबुकुमारच्या पत्नीच्या सांगण्यावरून येत नसल्याने दोन्ही आरोपी मित्रांनी रागाच्या भरात त्याची दुचाकी पेटवली. या आगीत पार्किंगमधील काही दुचाकी जळून खाक झाल्या. इत्तर दुचाकींना आग लागल्याचे पाहताच आरोपींना तिथून पळ काढला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.शिबुकुमार ठाकूर यानेच त्याच्या दोन मित्रांविरूद्द फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कणही ठाकूर (वय २८) आणि हिरालाल शर्मा (वय २४) या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहेत. 

Related Articles